महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामती लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी सुमारे २५ कोटींचा निधी मंजूर - nitin gadkari

मतदारसंघातील विविध रस्ते बांधणी, पूल उभारणी तसेच सध्याच्या काही रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत आज (गुरुवारी) केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने निधी जाहीर केला असल्याची माहिती सुळे यांनी दिली.

supriya sule
supriya sule

By

Published : Apr 22, 2021, 4:46 PM IST

बारामती - खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, इंदापूर, वेल्हा आणि पुरंदर तालुक्यातील विविध रस्त्यांची दुरुस्ती तसेच नव्याने रस्ते उभारणीसाठी केंद्र सरकारने सुमारे २५ कोटी निधी मंजूर केला आहे. सुळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहे.

आपल्या मतदारसंघातील विविध रस्ते बांधणी, पूल उभारणी तसेच सध्याच्या काही रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत आज (गुरुवारी) केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने निधी जाहीर केला असल्याची माहिती सुळे यांनी दिली. निधी मंजूर झालेल्या रस्त्यांमध्ये बारामती व इंदापूर तालुक्याला जोडणाऱ्या बारामती-जळोची-कण्हेरी-लाकडी-कळस-लोणी देवकर या रस्त्यासाठी ४ कोटी ९१ लाख ४८ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द-वडापुरी-गलांडे वाडी नं. २ या रस्त्यासाठी ४ कोटी ९१ लाख ४ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर पुरंदर तालु्क्यातील चांबळी कोडीत-नारायणपूर-बहिरटवाडी काळदरी या २८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ४ कोटी ९१ लाख ३४ हजार तर सासवड-राजुरी-सुपा रस्त्यासाठी ४ कोटी ९१ लाख ४० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याबरोबरच वेल्हे तालुक्यातील महाड-मढेघाट-नसरापूर ते चेलाडी या ३१ किमी अंतराच्या रस्त्यासाठी ४ कोटी ८१ लाख ४४ हजार रुपये मंजूर झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details