महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे : उपचारासाठी आलेल्या तरुणीवर डॉक्टरचा अत्याचार, बिबवेवाडी पोलिसात गुन्हा दाखल - फॅमिली डॉक्टरचा तरुणीवर अत्याचार पुणे बातमी

पुण्याच्या कोंढवा परिसरातील क्लिनिकमध्ये पंचकर्म उपचार करण्याच्या बहाण्याने डॉक्टरने 22 वर्षांच्या तरुणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी त्याच्याविरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

उपचारासाठी आलेल्या तरुणीवर डॉक्टरचा अत्याचार
उपचारासाठी आलेल्या तरुणीवर डॉक्टरचा अत्याचार

By

Published : Aug 11, 2020, 6:22 PM IST

पुणे - येथील कोंढवा परिसरात असलेल्या क्लिनिकमध्ये पंचकर्म उपचार करण्यासाठी रुग्णालयात आलेल्या एका 22 वर्षीय तरुणीवर डॉक्टरने वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. सुरेश वडियार असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे.

सदर घटना ही मार्च ते मे या कालावधीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टर हा पीडित तरुणीचा फॅमिली डॉक्टर आहे. कोंढवा परिसरात त्याचे आयुर या नावाने क्लिनिक आहे. 20 मार्च रोजी पीडित तरुणी उपचारासाठी त्याच्या क्लिनिकमध्ये गेली होती. यावेळी त्याने क्लिनिकमध्ये कोणीही नसल्याची संधी साधून तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. ही घटना क्लिनिकमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने पीडित तरुणीवर वारंवार अत्याचार केल. दरम्यान डॉक्टरकडून वारंवार केला जाणारा अत्याचार आणि बदनामीच्या धमकीला कंटाळून पीडित तरुणीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दिली. पोलिसांनी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक बोराटे करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details