महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

PUNE METRO : पहिल्याच दिवशी 22 हजार पुणेकरांचा मेट्रो प्रवास - pune metro travelling

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (रविवारी) पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर ( PM Modi Inaugrate Pune Metro ) कालपासूनच सर्वसामान्य पुणेकरांसाठी मेट्रो प्रवास सुरू करण्यात आला आहे. ( Pune Metro Open for All ) त्यानंतर उद्घाटन झाल्यानंतरच्या काही तासातच तब्बल बावीस हजार 437 पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केला.

pune metro
पुणे मेट्रो

By

Published : Mar 7, 2022, 6:03 PM IST

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (रविवारी) पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर ( PM Modi Inaugrate Pune Metro ) कालपासूनच सर्वसामान्य पुणेकरांसाठी मेट्रो प्रवास सुरू करण्यात आला आहे. ( Pune Metro Open for All ) त्यानंतर उद्घाटन झाल्यानंतरच्या काही तासातच तब्बल बावीस हजार 437 पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केला. यामध्ये मेट्रो प्रवसासाठी मोबाईल तिकीट काढणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणत असल्याचं दिसून आलं आहे.

रात्री दहापर्यंत या फेर्‍या सुरू -

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाले आणि दुपारी तीन वाजता पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो व्यावसायिक तत्त्वावर सुरू करण्यात आल्या. त्यानंतर रात्री दहापर्यंत या फेर्‍या सुरू होत्या. उद्घाटनानंतर च्या काही तासात वनाज ते गरवारे या मार्गावर 15842 प्रवाशांनी प्रवास केला आहे तर पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावर 4616 नागरिकांनी प्रवास केला आहे. रविवारी एकूण 22437 नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला असून यामध्ये जवळपास 1979 प्रवाशांनी मोबाईलवरुन तिकीट काढले आहे.

हेही वाचा -Ajit Pawar In Pune : सन्माननीय व्यक्ती काहीही वक्तव्य करतात! भर सभेत पंतप्रधानांकडे राज्यपालांची तक्रार

ABOUT THE AUTHOR

...view details