पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले 21 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण - कोरोना अपडेट
पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी देखील 21 कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली असून शहरातील रुग्णांची संख्या 274वर पोहचली आहे.
पिंपरी-चिंचवड - शहरातील कोरोना बाधितांची संख्या 274वर पोहचली असून शुक्रवारी दिवसभरात 21 नवे रुग्ण आढळले. तर 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या 161वर पोहचली आहे. गंभीर बाब म्हणजे शहरातील आनंद नगर परिसरात 13 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
याआधी देखील याच परिसरात 15च्या अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले होते. संबंधित परिसर हा कंटेन्मेंट झोनमध्ये असून सील करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी देखील 21 कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली असून शहरातील रुग्णांची संख्या 274वर पोहचली आहे. तर 161 जण कोरोनामुक्त झालेले आहेत. आनंद नगरमध्ये 13, भोसरीत 2, चिखली, राहाटणी, काळेवाडी, दापोडी, भाटनगर येथे प्रत्येकी 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. त्याचबरोबर मोशी, पिंपळेगुरव, चिखली, इंदिरानगर चिंचवड, चऱ्होली, यमुनानगर, भोसरी, सांगवी, नानापेठ पुणे या परिसरातील 20 जणांना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला.