पुणे - पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. गुरुवारी दिवसभरात एकट्या पुणे शहरात कोरोनाचे 208 नवीन रुग्ण सापडले आहेत, तर 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये सात महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.
पुण्यात दिवसभरात २०८ कोरोनाबाधितांची नोंद, सात जणांचा मृत्यू - पुणे कोरोना अपडेट
राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. सद्यस्थितीत पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा चार हजारावर जाऊन पोहोचला आहे. त्यामध्ये दररोज नवीन रुग्णांची भर पडत चालली आहे.
आजपर्यंत पुण्यात एकूण 4107 जणांना कोरोनाची लागणी झाली. यापैकी उपचारानंतर बरे झालेल्या 2182 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज दिवसभरात बरे झालेल्या 159 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महापालिकेच्या विविध रुग्णालयात अजूनही 1698 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे महापालिका कार्यक्षेत्रात आजवर 227 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दाट झोपडपट्टी असलेल्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडण्याची संख्या मोठी आहे. दरम्यान, दाट वस्ती असलेल्या झोपडपट्टी भागात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.