महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

PM Modi Visit To Dehu : देहूतील पंतप्रधानांच्या सभेला जायचं आहे?, पोलीस उपायुक्त म्हणतात... - पंतप्रधानांच्या देहू दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त

संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जूनला देहूत येणार ( PM Modi Visit To Dehu ) आहे. त्याच पार्श्वभूमीवर देहू परिसरात छावणीचे स्वरूप आले ( Police Tight Security For Pm Modi Visit To Dehu ) आहे.

PM Modi Visit To Dehu
PM Modi Visit To Dehu

By

Published : Jun 13, 2022, 4:16 PM IST

देहू ( पिंपरी-चिंचवड) - संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जूनला देहूत येणार ( PM Modi Visit To Dehu ) आहे. त्याच पार्श्वभूमीवर देहू परिसरात छावणीचे स्वरूप आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड पोलीसांनी कंबर कसली असून, मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 10 पोलीस उपायुक्त, 10 सहाय्यक पोलीस आयुक्त, 100 पोलीस निरीक्षकांसह 2 हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार ( Police Tight Security For Pm Modi Visit To Dehu ) आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही तासांमध्ये देहूत दाखल होणार आहेत. त्यांच्या हस्ते शिळा मंदिर आणि जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे लोकार्पण सोहळा होणार आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी देहू नगरी सज्ज झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षसाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 2 हजार पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होणार आहे.

पोलीस उपायुक्त अशोक भोईटे पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त पोलीस बंदोबस्ताची माहिती देताना

पोलीस उपायुक्त आनंद भोईटे म्हणाले की, सकाळी 8 वाजल्यापासून जुना मुंबई महामार्गावरून देहूत व्हीआयपी व्यक्तींनाच प्रवेश असेल. इतर वाहनांना प्रवेश नाही. सभास्थळी जाण्यासाठी तीन रस्ते ठेवण्यात आले आहेत. तळवडे, म्हाळुंगे आणि इंदोरी बाजूने या मार्गावरूनच नागरिक येऊ शकतात. पण, देहू गावात प्रवेश करण्यास मनाई आहे. नागरिकांच्या वाहनांची बायपासला सोय करण्यात आली आहे. खंडेलवाल चौकापासून परंडवाल चौकापर्यंत येण्यासाठी 20 बस आहेत. तिथून चालत सभास्थळी यायचं आहे, असेही आनंद भोईटे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा -PM Modi Dehu Visit : पंतप्रधानांच्या सभास्थळी जय्यत तयारी; 30 ते 40 हजार वारकरी राहणार उपस्थित

ABOUT THE AUTHOR

...view details