बारामती : दि.२३ मार्च २०२१ रोजी रोजी दुपारी तीनच्या सुमारास पिडीत अल्पवयीन एक मुलगी किराणा मालाच्या दुकानात मेहंदीची पुडी आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी प्रकाश अडागळे याने त्या पीडित मुलीला गोड बोलून स्वतःच्या घरी नेले आणि तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या संबंधिची तक्रार पिडीतेच्या आईने यवत पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक एस.ए.नागरगोजे यांनी केला आणि आरोपीच्या विरुध्द बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला.
आरोपी हा न्यायालयीन बंदी होता. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सुनिल वसेकर यांनी सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादी व पिडीतेची आई यांनी न्यायालयात साक्ष दिली. पिडीत मुलगी ही ६ वर्षाची अल्पवयीन आहे. तीने तीच्या सोबत घटलेली संपुर्ण घटना न्यायालयात सविस्तर सांगितली. यावेळी डॉक्टरांचीही साक्ष घेण्यात आली. ही साक्ष खटल्यात महत्वपुर्ण ठरली.