महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक.! चोरट्यांनी चाकणमधून 20 ऑक्सिजन सिलिंडरसह जीप पळवली - पुणे क्राईम बातमी

चाकणमधील महाळुंगे येथे ऑक्सिजन सिलेंडरच चोरी झाल्याची घटना घडली आहे.

चोरीला गेलेले वाहन
चोरीला गेलेले वाहन

By

Published : Sep 14, 2020, 9:45 PM IST

चाकण (पुणे) -पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. परिणामी ऑक्सिजन सिलेंडरची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. काही रुग्णांना ऑक्सिजन मिळाल्याने त्यांचा मृत्यू होत आहे. तर दुसरीकडे चाकणमधील महाळुंगे येथे ऑक्सिजन सिलेंडरचीच चोरी करत 20 ऑक्सीजन सिलेंडर असणारा वाहनच चोरट्यांनी पळवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

चोरट्यांनी चाकणमधून 20 ऑक्सिजन सिलिंडरसह जीप पळवली
चाकणमधील महाळुंगे इंगळे गावच्या हद्दीतील देवा इंटरप्रायजेस या एजन्सी समोरून ऑक्सिजनने भरलेले 13 आणि रिकामे 7, असे एकूण 20 सिलिंडर असलेली जीप, असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली आहे. याबाबत बाबुराव बिसाजी चौधरी यांनी महाळुंगे पोलीसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंगे पोलीस करत आहेत.

सध्या पुणे शहर व जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहेत. यामुळे ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी ऑक्सिजनचा पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. अशावेळी ऑक्सिजन सिलेंडर चोरीची घटना धक्कादायक असल्याचे समजले जात आहे.

हेही वाचा -राजगुरुनगर आगारातून एसटीच्या पुरेशा प्रवाशाविना ८६ फेऱ्या; इंधनाचाही खर्च निघेना

ABOUT THE AUTHOR

...view details