पुणे- येथील सोलापूर राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी आणि कंटेनरचा अपघात झाला आहे. यात एका चिमुरडीला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली होती. पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूरजवळ असलेल्या वरकुटे बुद्रुक याठिकाणी हा अपघात झाला.
पुणे - सोलापूर महामार्गावर दुचाकी आणि कंटेनरमध्ये अपघात; 2 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू - 2 वर्षीय मुलीचा अपघातामध्ये मृत्यू
दुचाकी आणि कंटेनरच्या या अपघातात दोन वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर, एकजण गंभीर जखमी झाला आहे. कंटेनरने विरुद्ध दिशेने येत दुचाकीला धडक दिली. या अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी काही वेळ महामार्ग रोखून धरला होता.

पुणे - सोलापूर महामार्गावर दुचाकी आणि कंटेनरमध्ये अपघात
हेही वाचा -पुण्याच्या मांडवगण फराटा परिसरात परतीच्या पावसाने शेतमालाचे नुकसान, भरपाईची शेतकऱ्यांची मागणी