अष्टापूर (पुणे) -तळेगाव ते जेजुरी रोडचे काम चालू असताना ठेकेदाराचे कामगार व चालकाला लोखंडी रॉडने दोघांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी ४च्या सुमारास अष्टापूर गावचे हद्दीत नदीजवळ घडली. याप्रकरणी दोन ग्रामस्थांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अष्टापूर येथे रस्ता दुरुस्तीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोखंडी रॉडने ग्रामस्थांनी केली मारहाण - Ashtapur villagers beat road repair workers news
तळेगाव ते जेजुरी रोडचे काम चालू असताना ठेकेदाराचे कामगार व चालकाला लोखंडी रॉडने दोघांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास अष्टापूर गावचे हद्दीत नदीजवळ घडली.

'कोणास विचारून काम चालू केले?'
याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव ते जेजुरी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पाटील कन्ट्रक्शन कंपनीमार्फत करण्यात येत आहे. कंपनीचे व्हिजिलेंस ऑफिसर सुरेश उमाप, प्रोजेक्ट मॅनेजर खान व चालक अमोल पोकळे हे अष्टापूर गावचे हद्दीत नदीजवळ रस्त्याचे कामाची देखरेख करण्यासाठी आले असता पोपट कोतवाल व नाना कोतवाल यांनी त्यांना कोणास विचारून काम चालू केले असा वाद घालून लोखंडी रॉडने मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.
माजी सैनिक संघटनेच्या वतीने निषेध
माजी सैनिक फिर्यादी सुरेश उमाप यांच्यावर ग्रामस्थांनी केलेल्या हल्ल्यानंतर माजी सैनिक संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांची भेट घेऊन संबंधितांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली.