पिंपरी-चिंचवड ( पुणे ) -पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपळे गुरव परिसरात घरगुती गॅसची ( Gas Cylinder Blast in Pimple Gurav Area ) गळती होऊन सिलेंडरचा भीषण स्फोट झाला असून यात, दोघे जण गंभीर जखमी ( 2 Person seriously Injured ) झाले आहेत. त्यांना तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल ( Hospitalized in Sasoon Pune ) करण्यात आल आहे. दोन्ही तरुण हे परराज्यातील आहेत. कुमार दिलीप सुकराम आणि रमेश असे जखमी तरुणांची नाव आहेत.
Pimpri Gas Cylinder Blast : पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; 2 जण गंभीर जखमी - गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट दोन जण जखमी
घरगुती गॅसची ( Gas Cylinder Blast in Pimple Gurav Area ) गळती होऊन सिलेंडरचा भीषण स्फोट झाला असून यात, दोघे जण गंभीर जखमी ( 2 Person seriously Injured ) झाले आहेत. त्यांना तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल ( Hospitalized in Sasoon Pune ) करण्यात आल आहे. दोन्ही तरुण हे परराज्यातील आहेत.
![Pimpri Gas Cylinder Blast : पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; 2 जण गंभीर जखमी Gas Cylinder Blast](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13851808-thumbnail-3x2-pim.jpg)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव परिसरात मोरया पार्क येथे कुमार आणि रमेश हे दोन्ही तरुण खोली भाड्याने घेऊन राहतात. आज (बुधवारी) दुपारच्या सुमारास अचानक घरगुती गॅसचा भीषण स्फोट झाला आहे. स्फोट अत्यंत भीषण असल्याने भिंतीलाही तडे गेले आहेत. घरातील साहित्य देखील अस्तव्यस्त पडले होते. तर, खिडक्यांच्या काचा देखील फुटल्या आहेत. या घटनेत तरुण गंभीर भाजले असून त्यांना तातडीने पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघेही डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.
TAGGED:
पिंपळे परिसरात गॅसचा स्फोट