महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ईटीव्ही स्पेशल' : दोन लाख तांदळांच्या दाण्यांवर 'राम नाम', अयोध्येतील भूमिपूजनाला तांदूळ वापरावेत!

आकाशचे वडील गजानन बाजड यांनीदेखील अशाचप्रकारे अनोखा विक्रम केला होता. मात्र, यावेळेस सच्चा राम भक्त या नात्याने आकाश आणि अर्पिताला हे राम असे लिहिलेले तांदळाचे दाणे अयोध्येत पोहचवायचे आहेत.

'ईटीव्ही स्पेशल' : दोन लाख तांदळांच्या दाण्यांवर 'राम नाम', अयोध्येतील भूमिपूजनाला तांदूळ वापरावेत!
'ईटीव्ही स्पेशल' : दोन लाख तांदळांच्या दाण्यांवर 'राम नाम', अयोध्येतील भूमिपूजनाला तांदूळ वापरावेत!

By

Published : Aug 3, 2020, 2:44 PM IST

पुणे -नववीत शिकणाऱ्या आकाश आणि अवघ्या नऊ वर्षांची असलेली अर्पिता या दोघांनी खास राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी दोन लाख तांदळांच्या दाण्यांवर 'राम' 'राम' चे उच्चारण लिहिण्याची किमया केली आहे. दरम्यान, हे तांदळाचे दाणे मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्यात वापरावेत अशी अपेक्षा दोघांनी व्यक्त केली असून स्थानिक पातळीवर प्रयत्नदेखील केले आहेत. मात्र, त्यांना यश येत नसल्याचे त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.

आकाश बाजड हा इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असून अर्पिता संकपाल ही इयत्ता चौथीमध्ये शिकत आहे. कोणतेही प्रशिक्षण न घेता आकाशने सहा महिन्यांपूर्वी एक किलो तांदूळ म्हणजे तब्बल दीड लाख तांदळाच्या दाण्यांवर तीन महिने अथक मेहनत करून राम, रामचे उच्चारण लिहिले आहे. आकाशचे वडील गजानन बाजड यांनीदेखील अशाचप्रकारे अनोखा विक्रम केला होता. मात्र, यावेळेस सच्चा राम भक्त या नात्याने आकाश आणि अर्पिताला हे राम असे लिहिलेले तांदळाचे दाणे अयोध्येत पोहचवायचे आहेत.

'ईटीव्ही स्पेशल' : दोन लाख तांदळांच्या दाण्यांवर 'राम नाम', अयोध्येतील भूमिपूजनाला तांदूळ वापरावेत!

अर्पिता हिने लॉकडाऊनमध्ये पन्नास हजार तांदळांच्या दाण्यांवर राम असे लिहिले असून त्यासाठी तिला तीन महिने परिश्रम घ्यावे लागले आहेत. आणखी पुढे चालून विक्रम करण्याचा मानस आहे. सध्या तरी तिला राम असे लिहिलेले तांदळाचे दाणे हे राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी पाठवण्याची इच्छा असून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आकाशचे वडीलदेखील मुलांनी केलेली मेहनत वाया जाऊ नये म्हणून अयोध्येत तांदूळ कसे जातील याचा विचार करत आहेत. आकाश आणि अर्पिता यांची रामभक्ती पाहता अयोध्येत तांदूळ पोहचविण्याचा प्रयत्न करत असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details