पुणे - राजगुरुनगर जवळील सातकरस्थळमध्ये दोन घरांना आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. या आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. यामध्ये घरगुती साहित्यासह जवळपास 55 लाखांचे नुकसान झाले आहे.
राजगुरुनगर जवळ आगीत दोन घरे जळून खाक; शॉर्ट सर्कीटचा अंदाज - fire news pune
राजगुरुनगर जवळील सातकरस्थळमध्ये दोन घरांना आग लागल्याची घटना सकाळी घडली असून, आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. या घरांसमोरील विद्युत वाहिनीच्या खांबावर शॉर्ट सर्किट झाल्याने त्यांच्या घरातही शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज स्थानिक नागरिकांकडून वर्तवण्यात आला आहे.
राजगुरुनगर जवळील सातकरस्थळमध्ये दोन घरांना आग लागल्याची घटना सकाळी घडली
राजगुरुनगर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांना काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
राहात्या घराला ऐन दिवाळीच्या तोंडावर आग लागल्याने संपूर्ण कुटुंब बेघर झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.