महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जेव्हा रक्षकच बनतात भक्षक, तरुणांना लुटणारे गजाआड - पुणे पोलीस बातमी

गृहरक्षक दलातील दोन जवानांनी पोलीस असल्याचा दावा करत अनेकांना लुटल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

2-home-guard-robbed-several-claiming-to-be-police
जेव्हा रक्षकच बनतात भक्षक, तरुणांना लुटणारे गजाआड

By

Published : Mar 5, 2020, 10:29 PM IST

Updated : Mar 5, 2020, 11:35 PM IST

पुणे -रक्षकच जेव्हा भक्षक बनतात तेव्हा सामान्य माणसांनी न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न निर्माण होतो. असा काहीसा प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये घडला आहे. गृहरक्षक दलातील दोन जवानांनी पोलीस असल्याचे सांगत अनेकांना लुटल्याचा प्रकार समोर आला आहे.

आशिष खरात आणि मिलींद सूर्यवंशी हे दोन चेहरे नीट बघून घ्या, आपण पोलीस असल्याचा धाक दाखवत अनेकांना हातोहात लुटणारे हेच ते दोघे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी या कामगार तरुणालाही लुटले. मात्र, तरुणाने धाडसाने पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार केली आणि हे दोघेजण पोलिसांच्या जाळ्यात अडकले

जेव्हा रक्षकच बनतात भक्षक, तरुणांना लुटणारे गजाआड

हेही वाचा -शिवजयंतीनंतर शिवनेरीवर आढळला दुसरा मृतदेह

धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांप्रमाणेच सामान्य नागरिकांचे रक्षण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या गृहरक्षक दलात हे दोघे कार्यरत आहेत. मात्र, पैशांच्या लालसेपोटी सराईत गुन्हेगारही लाजतील, असे कृत्य या दोघांनी केले आणि हे रक्षक नाही तर आरोपी झाले आहेत.

हेही वाचा -समुद्रतळातून शोधले दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तूल

तक्रार दाखल होताच या प्रकरणी पोलिसांनी आपली भूमिका चोखपणे बजावली. पण, तरीही हे कृत्य करणाऱ्या या दोघांना किंवा असेच गुन्हे करणाऱ्या इतर गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नव्हता, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या दुबळेपणाचा फायदा घेत या दोघांनी केलेल्या कृत्याची शिक्षा म्हणून अशा आरोपींना जास्तीत जास्त कारावास भोगावा लागला तरच पोलिसांचा अशा गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल.

Last Updated : Mar 5, 2020, 11:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details