पुणे - पिंपरी गावातील दरीत एका चारचाकी गाडीत २ जणांचे जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळले आहेत. मृत तरुण २५ ते ३० वयोगटातील असून ते सिंधुदुर्गमधील बांदा येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
पुण्यातील पिंपरी गावात जळालेल्या अवस्थेत आढळले २ मृतदेह, पोलिसांना घातपाताचा संशय
पिंपरी गावातील दरीत एका चारचाकी गाडीत २ जणांचे जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळले आहेत.
पुण्यातील पिंपरी गावात जळालेल्या अवस्थेत आढळलेली गाडी
मृत तरुण पुण्यात फिरण्यासाठी आले होते. मात्र, पिंपरी गावातील दरीत त्यांची गाडी आढळून आली आहे. दोन्ही मृतदेह ओळखू येत नाहीत. पोलिसांनी या घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.