महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेडिओ दुर्बीण प्रकल्पातील विज्ञान प्रदर्शनाची पारितोषिक वितरणाने सांगता - रेडिओ दुर्बीण प्रकल्प विज्ञान प्रदर्शन

जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण असलेल्या जीएमआरटी खोडद येथे २ दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनास यावर्षी जवळपास २४ हजार विज्ञान प्रेमींनी भेट दिल्याची नोंद करण्यात आली आहे.

रेडिओ दुर्बीण प्रकल्पातील विज्ञान प्रदर्शनाची पारितोषिक वितरण करुन सांगता
रेडिओ दुर्बीण प्रकल्पातील विज्ञान प्रदर्शनाची पारितोषिक वितरण करुन सांगता

By

Published : Mar 1, 2020, 10:58 AM IST

पुणे - जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण असलेल्या जीएमआरटी खोडद येथे २ दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनास यावर्षी जवळपास २४ हजार विज्ञान प्रेमींनी भेट दिल्याची नोंद करण्यात आली आहे.

रेडिओ दुर्बीण प्रकल्पातील विज्ञान प्रदर्शनाची पारितोषिक वितरण करून सांगता

दिवसेंदिवस नवनवीन संशोधनाकडे प्रत्येकाचा कल वाढत चालला आहे. त्यातच शाळकरी विद्यार्थी संशोधनात अग्रेसर असताना पहायला मिळत आहेत. खोदड येथील २ दिवसीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रकल्प ४ स्तरांमध्ये विभागले होते. इयत्ता पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी, अकरावी / बारावी / आयटीआय / डिप्लोमा, बीएस्सी व बीई / एमई, एमएस्सी अशा ४ विभागात प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिके आज(रविवार) देण्यात आली.

हेही वाचा -सावित्रीबाई फुले विद्यापीठात 'अनुभव केंद्रा'चे उद्घाटन

या पारितोषिक वितरण समारंभात वरिष्ठ परिवहन अधिकारी अनिल पंतोजी, हैदराबाद येथील नॅशनल रिमोट सेन्सिंग सेन्टर (इसरोच्या राजश्री बोथाले, जीएमआरटी चे वित्त व प्रशासकीय प्रमुख डॉ. जेके सोळंकी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी अभी जोंधळे, आदि उपस्थित होते. यावेळी प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्वांना प्रशस्तीपत्र देण्यात आली. दरम्यान खोडद येथील जीएमआरटीमध्ये भरविण्यात येत असलेल्या विज्ञान प्रदर्शनाला शाळकरी मुलांसह नागरिकांनी मोठा सहभाग नोंदविला. त्यामुळे पुढील काळात याचे व्यापक रुप पहायला मिळणार असल्याची शक्यता आहे.

हेही वाचा -शिरुरमध्ये बेकायदेशीर धंद्यांची तक्रार देणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण

ABOUT THE AUTHOR

...view details