महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आंबेगाव तालुक्यात घोडनदीत बुडून दोन बहिण-भावाचा मृत्यू

आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग गावात पाण्यात बुडून दोन चिमुकल्या बहिण-भावाचा मृत्यू झाला. पुणे जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी दोघांना मृत घोषीत केले असून मंचर पोलीस अधिक तपास करत आहेत.

घोडनदीत बुडून दोन चिमुकल्या बहिण-भावाचा मृत्यू

By

Published : Jun 15, 2019, 4:34 PM IST

Updated : Jun 15, 2019, 5:28 PM IST

पुणे- आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग गावात पाण्यात बुडून दोन चिमुकल्या बहिण-भावाचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना शनिवारी दुपारी घडली. प्रेम विजय पवार आणि काजल विजय पवार अशी मृत बहीण-भावांची नावे आहे. दोघे विश्रांतवाडी पुणे येथे राहणारे होते.

घोडनदीत बुडून दोन चिमुकल्या बहिण-भावाचा मृत्यू

वडगाव काशिंबेग येथील घोडनदीवर प्रेम आणि काजल हे दोघे चुलती व दोन मोठ्या भावंडांसह कपडे धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी नदीच्या किनाऱयावर खेळत असताना प्रेमचा पाय घसरून नदीत पडला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याची बहीण काजल पाय घसरुन नदीत पडली.

पोहता येत नसल्याने दोन्ही चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. पुणे जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी दोघांना मृत घोषीत केले असून मंचर पोलीस अधिक तपास करत आहेत.

सध्या शाळांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने लहान मुले नातेवाईकांकडे गेले आहेत. मोकळ्या वातावरणात खेळायला मिळाले कि कुठलीच भिती न ठेवता मुले बेभान होऊन खेळत असतात. त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडतात.

Last Updated : Jun 15, 2019, 5:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details