पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अडीच वर्षीय मुलीचे अपहरण करून खून केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, शवविच्छेदन झाल्यानंतर नेमके चिमुकलीसोबत काही अघटित घडले आहे का? हे अहवालाद्वारे समोर येणार आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये अडीच वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून खून; लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय - मिलिटरी कॅम्प
पिंपरी-चिंचवडमध्ये सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अडीच वर्षीय मुलीचे अपहरण करून खून केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, शवविच्छेदन झाल्यानंतर नेमके चिमुकलीसोबत काही अघटित घडले आहे का? हे अहवालाद्वारे समोर येणार आहे.
आज (२३ जुलै) पहाटेच्या सुमारास मिलिटरी कॅम्पच्या सीमाभिंतीच्या पलीकडे एका खड्ड्यात साचलेल्या पाण्यात एका दीड वर्षीय चिमुकलीचा मृतदेह आढळला. मृत चिमुकलीचे सोमवारी रात्री दीडच्या सुमारास आई-वडील झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने अपहरण केले. दरम्यान, रात्री उशिरा आईला जाग आल्याने चिमुकली बेपत्ता झाल्याचे तिच्या कुटुंबीयांना समजले. त्यानंतर तिचा २ तास परिसरात शोध घेण्यात आला. मात्र, ती भेटत नसल्याने अखेर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
त्यानुसार सांगवी पोलीस आणि आई-वडील मुलीचा शोध घेत होते. तेव्हा, घराच्या पाठीमागे काही अंतरावर सीमाभिंतीच्या आत खड्यात साचलेल्या पाण्यात मुलीचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. या घटनेचा तपास सांगवी पोलिसांनी सुरू केले असून संशयित तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. मृत चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला आहे की नाही हे शवविच्छेदन अहवालात समोर येणार आहे. मात्र, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.