महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विघ्नहर मंदिरातील सुवर्णलेपीत छत्री चोरणारे दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या - विघ्नहर मंदिर चोरी बातमी

अष्टविनायकांपैकी एक ओझर येथील विघ्नहर मंदिरातून श्रींच्या सुवर्णलेपीत छत्री चोरून नेणाऱ्या दोन आरोपींना दुसऱ्या ठिकाणी दरोडा टाकताना रंगेहाथ पोलिसांनी पकडले. मंदिरातील चोरी प्रकरणी आणखी तिघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुजावर यांनी दिली.

police with accused
आरोपींसह पोलीस पथक

By

Published : Aug 25, 2020, 3:37 PM IST

जुन्नर (पुणे) - अष्टविनायकांपैकी एक ओझर येथील विघ्नहर मंदिरातून श्रींच्या सुवर्णलेपीत छत्री चोरून नेणारे दोन आरोपी आळेफाटा पोलिसांनी बेल्हे गावाजवळ दरोडा टाकताना रंगेहाथ पकडले. आहेत याप्रकरणी आणखी तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. आळेफाटा पोलिसांनी रात्र गस्तीच्या वेळी ही कारवाई केली.

विठ्ठल पतवे (वय 47 वर्षे) व सोन्या पतवे (वय 27 वर्षे, दोघेही रा. अकोले) या आरोपींना अटक करण्यात आले असून, अन्य तिघांचा शोध सुरू आहे.

ओझरच्या विघ्नहर मंदिरातून 27 जुलैला दोन किलो वजनाची चांदीची सुवर्णलेपीत छत्री चोरट्यांनी चोरून नेली होती. तर गाभाऱ्यात असलेल्या दोन दानपेट्यांपैकी, एक दानपेटी फोडून रक्कम लांबवली होती. आरोपींकडून दुचाकीसह चॅापर, कोयता, कटावणी असे दरोडा घालण्यासाठी आणलेले साहित्य जप्त केल्याची माहिती आळेफाटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक टी.वाय. मुजावर यांनी दिली.

विघ्नहर गणपती मंदिरातील चोरीचा छडा आळेफाटा पोलिसांच्या कामगीरीमुळे लागणार असल्याने गणेशभक्तांमध्ये आनंदाची भावना व्यक्त होत आहे.

हेही वाचा -सांगा गणपती विसर्जन करायचे कुठे? शिवसेनेचे पालिकेमध्ये आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details