पुणे- सध्या मटणाच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे बकऱ्यांना चांगलेच भाव आलेत. त्यामुळे आता बकऱ्या चोरी जाण्याच्या घटना उघडकीस येत आहेत. पुणे जिल्ह्यातील खानापूर या गावातून चोरट्यांनी शनिवारी (दि. 18 जुलै) मध्यरात्री 19 बकऱ्या चोरुन नेल्या आहेत.
पुणे : खानापूरमधून 19 बकऱ्या गेल्या चोरीला, गुन्हा दाखल - गुन्हे बातमी
पुण्याच्या हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका मटणाच्या दुकानातून तब्बल 19 बकऱ्या चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करत आहेत.
हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खानापूर परिसरात अजिज शेख यांचे मटणाचे दुकान आहे. गटारीमुळे त्यांनी आपल्या दुकानात बकरे आणून ठेवले होते. दरम्यान, शेख हे शनिवारी नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन गेले होते. रविवारी (दि. 19 जुलै) सकाळी ते दुकानात आले असताना दुकानातील एकोणीस बकऱ्या गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी हवेली पोलिसांना याची माहिती दिली.
हवेली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ज्या ठिकाणाहून बकऱ्या चोरीला गेल्या त्या जागेचा पंचनामा केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस आता या बकऱ्या चोरणाऱ्यांचा शोध घेत आहेत.