महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहिल्यादेवी हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे सावित्रीबाई फुलेंना अनोखे अभिवादन - अहिल्यादेवी हायस्कूल पुणे

१ जानेवारी हा दिवस 'फुले दाम्पत्य सन्मान दिन' म्हणून साजरा केला जातो. तर, ३ जानेवारीला सावित्रीबाईंची १८९ वी जयंती आहे. या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित अहिल्यादेवी हायस्कूलच्या १८९ विद्यार्थिनी सावित्रीबाई फुलेंच्या वेशभूषेत शाळेत आल्या होत्या.

school
अहिल्यादेवी हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे सावित्रीबाई फुलेंना अनोखे अभिवादन

By

Published : Jan 2, 2020, 5:03 PM IST

पुणे - फुले दाम्पत्य सन्मान दिन आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित अहिल्यादेवी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुलेंना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. यावेळी शाळेतील १८९ विद्यार्थिनी सावित्रीबाई फुलेंच्या वेशभूषेत शाळेत आल्या होत्या. तसेच, याच वेशभूषेत त्यांनी लॅपटॉप, मोबाईल, हेडफोन अशा आधुनिक शिक्षण साहित्यांचा उपयोग केला. सावित्रीबाईंमुळेच मुलींना हे दिवस पाहायला मिळत आहेत, याबद्दल मुलींनी त्यांच्याप्रती ऋण व्यक्त केले.

अहिल्यादेवी हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे सावित्रीबाई फुलेंना अनोखे अभिवादन

हेही वाचा -महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाईंना भारतरत्न द्या - नवनीत राणा

१ जानेवारी १८४८ ला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यामुळे, १ जानेवारी हा दिवस 'फुले दाम्पत्य सन्मान दिन' म्हणून साजरा केला जातो. तर, ३ जानेवारीला सावित्रीबाईंची १८९ वी जयंती आहे. या दोन्ही दिवसांनिमित्त डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्यादेवी हायस्कूलच्या १८९ विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंना आगळीवेगळी आदरांजली वाहिली.

ABOUT THE AUTHOR

...view details