पुणे - वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मोरगाव तरडोली येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. यामध्ये सहा लाख 95 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 18 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मोरगाव तरडोली येथे पत्त्याच्या जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना मिळाली. त्यानुसार बारामतीच्या गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस जवान आणि वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह अचानक छापा टाकला. यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये 15 जुगारी पत्त्यांवर जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडून 79 हजार 350 रुपये रोख रक्कमेसह सहा लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.