पुणे- आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव-गोणवडीजवळच्या घोडनदीत पोहोयला गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मोहम्मद अनस नफीस अन्सारी असे त्या तरुणाचे नाव आहे.
घोडनदीवरील बंधाऱ्यात पोहायला गेलेला मुलाचा बुडून मृत्यू घोडनदीपात्रातील बंधाऱ्यावर मोहम्मद अन्सारी हा शुक्रवारी दुपारी मित्रांसमवेत पोहायला गेला होता. सध्या घोडनदीपात्रात धरणातून पाण्याचे अर्वतन सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचे प्रमाण जास्त आहे. यावेळी पोहायला पाण्यात उतरेलेल्या मंहमदला पाण्याचा अंदाज न आल्याने मोहम्मद अन्सारी पाण्यात बुडाला. त्यानंतर या घटनेची माहिती गावात समजताच स्थानिक रेस्क्यु टिमच्या सहाय्याने त्याचा शोध सुरू करण्यात आला. रात्री उशीरापर्यत शोध कार्य केले. मात्र मुलाचा शोध लागला नाही. अखेर आज सकाळी पाण्यात बुडालेल्या मुलाचा मृतदेह बंधाऱ्यातील पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आला.
नदी पात्रात पोहणे टाळा-
सध्या वातावरणातील वाढत्या तापामानामुळे तरुणाई पाण्यात पोहण्यासाठी जात असतात. मात्र पाणी व खोल भागाचा अंदाज येत नसल्याने पाण्यात बुडण्याच्या घटना वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रदीप पवार यांनी सांगितले.