महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Midc Fire : अग्नितांडवातील मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी आणखी चार दिवस लागणार - निकुंज शहा अटक

पिरंगुट येथील एसव्हीएस ऍक्‍वा कंपनीत लागलेल्या भीषण अग्निकांडात 17 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. त्यांच्यावर अंत्यसंस्कार होण्यासाठी आणखी चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. दरम्यान, कंपनीचा मालक निकुंज शहावर सदोष वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्याल 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.

pune
pune

By

Published : Jun 9, 2021, 9:59 PM IST

पुणे- पिरंगुट येथीलएसव्हीएस ऍक्‍वा कंपनीतील भीषण अग्निकांडात 17 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. यातील मृतदेहांची ससेहोलपट अजूनही संपली नाही. त्यांच्यावर अंत्यसंस्कार होण्यासाठी आणखी चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी मयत व्यक्तीच्या नातेवाईकांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. ही संपुर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी आणखी चार दिवस लागतील. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची मदत लागणार आहे. पुण्यातील फॉरेन्सिक लॅबमध्ये ही चाचणी केली जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

कंपनी मालकाला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी

पिरंगुट एमआयडीसीतील रासायनिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला. याप्रकरणी कंपनी मालक निकुंज शहा (39 वर्षे, रा. सहकारनगर) याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (8 जून) रात्री त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर आज (9 जून) न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी निकुंज शहाला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. या आगीप्रकरणी निकुंज शहा याच्यासह बिपिन शहा (68 वर्षे), केयुर बिपिन शहा (41 वर्षे) यांच्या विरोधातही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -पंतप्रधानांनी मराठा आरक्षणात हस्तक्षेप करुन निर्णय घ्यावा - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details