महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bhimathadi Jatra : भीमथडी जत्रेला पुणेकरांचा उस्फूर्त प्रतिसाद, विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेतून साकारली अनोखी नवनिर्मिती - भीमथडीतील विविध नवनिर्मिती

पुणे येथे अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती संचालित, शारदा महिला संघ, भीमथडी फौंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या 16 व्या भीमथडीत (16th Bhimathadi Jatra) या वर्षी अनेक नवनवीन दालने पाहायला मिळत (Organizing various things) आहेत. शालेय विदयार्थ्यांना थोडेसे स्वातंत्र्य दिले, त्यांच्या बुद्धिमत्तेला वाव दिला तर ते नवनिर्मितीचा परिपोष करू शकतात, हे या वर्षीच्या भीमथडीच्या प्रवेश द्वारावरून व प्रवेश केल्यानंतर टाकाऊतून बनविलेल्या रोबोट सह इतर टिकाऊ वस्तू पाहिल्यानंतर लक्षात येत असून, पुणेकर नागरिकांकडून या भीमथडीला उत्स्फुर्त असा प्रतिसाद (Spontaneous response of Pune residents) मिळत आहे. Bhimathadi Jatra

Bhimathadi Jatra
भीमथडी जत्रा

By

Published : Dec 24, 2022, 1:38 PM IST

ईटिव्हीशी संवाद साधतांना भीमथडीच्या आयोजक सुनंदा पवार

पुणे : पुणे येथे अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती द्वारे संचालित, शारदा महिला संघ, भीमथडी फौंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या 16 व्या भीमथडी प्रदर्शनी (16th Bhimathadi Jatra) मध्ये नवनवीन गोष्टी बघायला व शिकायला मिळत (Organizing various things) आहे. टाकाऊतून बनविलेल्या रोबोट सह इतर टिकाऊ वस्तू बघायला, पुणेकर नागरिकांकडून या भीमथडीला उत्स्फुर्त असा प्रतिसाद (Spontaneous response of Pune residents) मिळत आहे. Bhimathadi Jatra


भीमथडीतील विविध नवनिर्मिती :प्लॅस्टिक मटेरियल, खाद्य पदार्थाची पाकिटे, इलेक्ट्राॅनिक उपकरणे, मेडिकल वेस्ट, टायर्स, DVD, असे जे पर्यवरणाला हानिकारक वेस्ट आहे, त्याचे रीसायकल करून भिमथडीत या वर्षी रोबोट, राष्ट्रीय पक्षी मोर, विविध प्राणी व पक्षी, हेलिकॉप्टर, राक्षस अशी विविध नवनिर्मिती 'शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर' या शाळेतील मुलांनी केली आहे. भिमथडीला या मुलांनी टाकाऊ पासून बनिविलेल वस्तू मुख्य प्रवेशद्वारच्या आतमध्ये आल्यावरच पाहायला मिळत आहे.

भीमथडी जत्रा



भीमथडीतील सांस्कृतिक वेगळेपण :यावर्षीही भीमथडीमध्ये ग्रामीण कला संस्कृती जोपासली असून, या मध्ये वासुदेव, गोधळी, धनगरी नृत्य, पोतराज, आदिवासी नृत्य, भारुड इत्यादी कलाकार आपली कला सादर करत आहेत. तर पाथरवट, माती कारागीर, लाकडावर कोरीव काम करणारे कारागीर, कृतिशील विज्ञान, बांबूच्या वस्तू बनविणारे आदी कलाकार आपली कला सादर करून पुणेकरांची करमणूक करत आहेत.

पौष्टिक पदार्थांची रेलचेल :2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष आहे. त्या निमित्त देशभरात भरड धान्याविषयी (नाचणी, राळ, सावा, भगर, सामा, वरई ) सर्वत्र जणजागृती चालू आहे. भरडधान्य ही आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असल्याने त्याचा आहारातील वापर वाढत चालला आहे. रोजच्या आहारातील गहू, तांदूळ या मध्ये असलेले ग्लूटेन व कार्बोहायड्रेड हे आरोग्याच्या दृष्टीने तितकेसे उपयुक्त नसून या पासून बनविलेले पदार्थ जादा प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. पॉझिटिव्ह मिलेटमध्ये ज्वारी, बाजरी, राळे, भगर, सावा, बर्टी, वरई, असे विविध पदार्थ मोडत असून, त्या पासून विविध पदार्थही बनवता येतात. जसे की ज्वारी पासून रवा, उपमा, खीर, पोहे बनवता येतात. तर बाजरीपासून नूडल्स व मल्टिमिलेट लाडू, बर्टी पासून भात, धिरडे, डोसा असे आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक पदार्थ तयार करता येतात. हे सर्व पदार्थ भीमथडीत तयार होत असून पुणेकरांनी या स्टॅालला भेटी द्याव्यात. असे आवाहन करण्यात येते आहे.

भीमथडी जत्रा



भीमथडीतील बिस्किटे : सिद्धिविनायक बचत गट बावडा इंदापूर हा गट यावेळी वेगळा पदार्थ भीमथडीत घेऊन आला असून त्यांचे शुगर फ्री बिस्कीट भीमथडीत भाव खात आहे. दर्जेदार गव्हाचे पीठ व स्टीविया पानांची पावडर या पासून अत्यंत कौशल्याने ही बिस्किटे बनविली जात आहेत. शुगर असणाऱ्यांसाठी ही बिस्किटे म्हणजे एक पर्वणी असून पुणेकर ही बिस्किटे खरेदी करताना दिसत आहेत. 25 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या भीमथडी जत्रेला पुणेकर नागरिक मोठ्या प्रमाणात भेट देत असून, याला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळत आहे.

23 जिल्ह्यातील महिला बचतगट : यंदाच्या या भीमथडी जत्रेमध्ये तब्बल साडेतीनशेहून अधिक स्टॉल विविध लागले आहे. यात तब्बल 23 जिल्ह्यातील महिला बचत गट सहभागी झाले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भीमथडीच्या गेटवर तशी डिझाईन करण्यात आली आहे. या भीमथडी जत्रेत विविध कपडे चप्पल खाद्यपदार्थ तसेच ग्रामीण भागातील संस्कृती असे विविध स्टॉल लागले आहे. मोठ्या प्रमाणात महिलांना देखील यातून रोजगार उपलब्ध झाला आहे.



भीमथडीत तब्बल 350 स्टॉल :महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील शिवालय महिला बचतगटाच्या टाकाऊ प्लास्टिकपासून बनविलेल्या पिशव्या (बॅगा), भरतकाम (एम्ब्रॉयडरी), बांबूच्या फॅब्रिकपासून बनविलेला बाळाचा दुपट्टा यांसह अन्य राज्यांमधील विशेषतः गुजरातमधील नैसर्गिक रंगाच्या माध्यमातून रंगविलेले खादी कपडे, पश्चिम बंगालमधील हस्तनिर्मित नक्षीकाम केलेल्या विविध वस्तू, रेशीम सुती कपडे, हातमागाचे कपडे, राजस्थानी पारंपरिक चित्रकला (पेंटिंग), हरियानाच्या दलाई पद्धतीच्या हस्तकला, आसाममधील ग्लास बेस ज्वेलरी, काचेपासून बनविलेले महिलांसाठीचे विविध प्रकारचे दागिने, तेलंगणामधील एकत सुताचे विविध प्रकार, राजस्थानचे मलमल सुतीकाम (कॉटन वर्क), आंध्र प्रदेशमधील लोकप्रिय एकत कलाकुसर, दिल्लीचे नैसर्गिक रंगाचे हॅन्ड ब्लॉक्स पहावयास मिळत आहेत. Bhimathadi Jatra

ABOUT THE AUTHOR

...view details