पुणे (पिंपरी) - पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव भागात वेश्या व्यवसाय करणाऱ्या 16 विदेशी तरुणींना सामाजिक सुरक्षा पथकाने सापळा रचून ताब्यात घेतलं आहे. पैकी, चार महिला या इतर तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करत असल्याचं समोर आले आहे. या सर्व तरुणी नायजेरियन असून काही तरुणींकडे पासपोर्ट नसल्याचं समोर येत आहे.
पिंपरीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या 16 तरुणी ताब्यात - सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव भागात वेश्या व्यवसाय करणाऱ्या 16 विदेशी तरुणींना सामाजिक सुरक्षा पथकाने सापळा रचून ताब्यात घेतलं आहे.
या घटनेचा अधिक तपास सांगावी आणि सामाजिक सुरक्षा पथक करत आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी दिली आहे. ही कारवाई सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस उपनिरीक्षक कविता रूपनर, हेमा साळुंके, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, पोलीस कर्मचारी धैर्यशील सोळंके, विजय कांबळे, बारकुले, अस्वले, गवारी, करचुंडे, मुठे, भारती, मारुतीराव जाधव, महाजन, तिडके, लोंढे, शिरसाठ, कोकाटे, कारोटे, महिला पोलीस कर्मचारी, गावडे, जाधव, माने, कचरे, पठाण, गाडेकर, मिसाळ यांच्यासह रेस्क्यू फाउंडेशन हडपसर यांचा सहभाग होता.
हेही वाचा-मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विकास कामांवर परिणाम