महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पावसाचे थैमान..! पुणे विभागात आतापर्यंत पावसाचे 16 बळी; 1 लाख 32 हजार लोक स्थलांतरित - विभागीय आयुक्त दिलीप म्हैसेकर

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे विभागात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक बळी (७) सातारा जिल्ह्यात गेले आहेत. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

पुणे विभागात आत्तापर्यंत पावसाचे 16 बळी; सर्वाधिक बळी सातारा जिल्ह्यात

By

Published : Aug 7, 2019, 7:12 PM IST

Updated : Aug 7, 2019, 9:13 PM IST

पुणे-राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पुणे विभागात आतापर्यंत 16 जणांचा बळी घेतला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील 7, पुणे 4, सांगली 2, कोल्हापूर 2 आणि सोलापूर जिल्ह्यातील एका नागरिकाचा समावेश आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांची प्रतिक्रिया

आतापर्यंत विभागात 137 टक्के पाऊस झाला असुन, 58 तालुक्यांपैकी 30 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. भीमा नदी खोरे क्षेत्रातील परिस्थिती सुधारत आहे. हळूहळू जनजीवन पुर्वपदावर येत आहे. पुणे विभागात एकूण 1,32,360 लोकांना स्थलांतरित केले आहे. दरम्यान, कोल्हापूरमधील 390 गावांचा, साताऱ्यातील 91 गावांचा पाणी पुरवठा बंद आहे. तो पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच वैद्यकीय पथकही काम करत आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, आंबेगाव, शिरुर, खेड या 8 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे निर्माण झालेल्या पुरसदृश्य स्थितीमुळे 3,343 कुटुंबातील 13,336 नागरिकांना स्थलांतर करण्यात आले. या नागरिकांना महानगरपालिका शाळा, जिल्हा परिषद व इतर सार्वजनिक इमारतीमध्ये स्थानांतरित करण्यात आले आहे.

Last Updated : Aug 7, 2019, 9:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details