महाराष्ट्र

maharashtra

पुणे विभागात सोमवारी आढळले 16 नवे कोरोना रुग्ण, जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 337

By

Published : Apr 14, 2020, 9:06 AM IST

विभागातील 63 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, 13 एप्रिलला विभागात 16 नवीन रुग्ण आढळले आहेत. अशात सोमवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. विभागातील एकूण रुग्ण संख्या 337 झाली आहे.

16-new-corona-cases-in-pune-division-on-monday
पुणे विभागात सोमवारी आढळले 16 नवे कोरोना रुग्ण

पुणे- विभागातील 63 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, 13 एप्रिलला विभागात 16 नवीन रुग्ण आढळले आहेत. अशात सोमवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. विभागातील एकूण रुग्ण संख्या 337 झाली आहे.

सध्या विभागात 241 ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. सोमवारी याठिकाणी 16 नवीन रुग्णांची नोंद झाली. अहवालानुसार, सोमवारी ससून रुग्णालयात पुणे येथील 50 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाला न्युमोनीया आणि किडनी विकार होता.

पुणे विभागातील परिस्थिती -

पुणे मनपामध्ये बाधित रुग्ण 250 तर मृतांची संख्या 30. पिंपरी चिंचवड मनपामध्ये बाधित रुग्ण 34, तर एकाचा मृत्यू. पुणे ग्रामीणमध्ये बाधित रुग्ण 12, मृत्यू 1. पुणे कॅन्टोन्मेंट बाधित रुग्ण 2, कोल्हापूर बाधित रुग्ण 5 , सातारा बाधित रुग्ण 7, मृत्यू 2. सांगली बाधित रुग्ण 26, सोलापूर बाधित रुग्ण 1 मृत्यू 1, अशी विभागातील परिस्थिती असून एकूण 337 कोरोनाबाधित तर 35 जणांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत विभागामध्ये एकूण 5 हजार 392 नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 5 हजार 125 चा अहवाल प्राप्त आहे. 267 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 4 हजार 788 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 337 चा अहवाल पॉझिटीव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील 30,89,388 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत1,19,00250 व्यक्तींची तपासणी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details