पुण्यात मृत्यूचे तांडव; संरक्षक भिंत कोसळून 15 कामगारांचा मृत्यू - WALL COLLAPSED
मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस, एनडीआरएफ आणि महापालिका प्रशासन यांच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
घटनास्थळाचा आढावा घेताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी किरण शिंदे
पुणे- शहरातील कोंढवा परिसरात संरक्षण भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस, एनडीआरएफ आणि महापालिका प्रशासन यांच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनास्थळाचा आढावा घेतला आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी किरण शिंदे यांनी....