महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात आतापर्यंत 1 हजार 486 रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात - pune latest news

दिवसेंदिवस पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. पुणे शहरात आतापर्यंत 2 हजार 987 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर त्यातील उपचारानंतर बऱ्या झालेल्या 1 हजार 486 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

pune district
पुण्यात आतापर्यंत 1 हजार 486 रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात

By

Published : May 14, 2020, 10:25 PM IST

पुणे -दिवसेंदिवस पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. पुणे शहरात आतापर्यंत 2 हजार 987 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर त्यातील उपचारानंतर बऱ्या झालेल्या 1 हजार 486 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत 1 हजार 332 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा हा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. ही बाब पुणेकरांच्या दृष्टीने चिंता वाढवणारी आहे.



आज (गुरुवार) दिवसभरात 163 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर दिवसभरात 109 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आज 6 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 169 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही 116 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 34 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details