पुणे -आत्तापर्यंत पुणे विभागातील 14 हजार 445 कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या 23 हजार 970 झाली आहे. सध्या 8 हजार 535 अॅक्टीव रूग्ण आहेत तर 990 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 496 रूग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यात पुणे जिल्ह्यातील 19 हजार 587 रूग्णांचा समावेश आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 11 हजार 375 बाधित रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यातील अॅक्टीव रूग्ण संख्या 7 हजार 532 झाली असून 680 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 381 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 58.07 टक्के आहे तर मृत्यूचे प्रमाण 3.47 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रूग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागातील रुग्णांच्या संख्येमध्ये 811 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 747, सातारा 29, सोलापूर 10, सांगली 6 व कोल्हापूर 19 रुग्णांचा समावेश आहे.
सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 917 वर गेली असून असून 689 बाधित रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यातील अॅक्टीव रूग्ण संख्या 186 आहे तर 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.