पुणे- इमारतीची संरक्षक भिंत पत्र्याच्या खोल्यांवर कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातात भिंतीच्या मलब्याखाली दबून १५ मजुरांचा मृत्यू झाला. ही घटना कोंढव्यातील सोमाजी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडली. हे मजूर बिहार राज्यातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता बचावकार्य पूर्ण झाले असून मतदेह त्यांच्या मूळ गावाकडे रवाना करण्यात आले. हे मृतदेह उद्या सकाळपर्यंत त्यांच्या मूळ गावात पोहोचणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोंढव्यात कांचन कम्फर्ट इमारतीच्या विकासकाने मजुरांसाठी पत्र्याच्या खोल्या बांधल्या आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर या खोल्यांवर शेजारच्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. भिंत मोठी असून कामगारांच्या खोल्या खड्ड्यात असल्याने मोठ्या प्रमाणात भिंतीचा मलबा पडला आहे. यावेळी मजूर झोपेत असल्याने भिंतीच्या मलब्याखाली दबले.
आतापर्यंत घटनास्थळांवरून ५ मजुरांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढलेले आहेत. या मृतदेहांना ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे.
मृतांची नावे
- आलोक शर्मा - ( वय २८ वर्ष )
- मोहन शर्मा - ( वय २० वर्ष )
- अजय शर्मा - ( वय १९ वर्ष )
- अभंग शर्मा - ( वय १९ वर्ष )
- रवि शर्मा - ( वय १९ वर्ष )
- लक्ष्मीकांत सहानी - ( वय ३३ वर्ष )
- अवधेत सिंह - ( वय ३२ वर्ष )
- सुनील सींग - ( वय ३५ वर्ष )
- ओवी दास - ६ वर्षे (लहान मुलगा )
- सोनाली दास - 2 वर्षे (लहान मुलगी )
- विमा दास - ( वय २८ वर्ष )
- संगीता देवी - ( वय २६ वर्ष )
जखमी-
- पूजा देवी - ( वय २८ वर्ष )
घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य करत आहेत. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मृतदेह शोधण्यासाठी घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले दु:ख