महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोहगाव विमानतळावरून १४ लाखांचे सोने जप्त - Lohagaon

लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय सीमा शुल्क विभागाने एक व्यक्तिकडून 14.66 लाख रुपये किमतीचे सोने जप्त केले.

१४ लाखांचे सोने जप्त

By

Published : Mar 17, 2019, 9:18 PM IST

पुणे- लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय सीमा शुल्क विभागाने एक व्यक्तिकडून 14.66 लाख रुपये किमतीचे सोने जप्त केले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, रविवारी स्पाइस जेटच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आलेल्या प्रवाशांची संशयावरून सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी चौकशी केली होती. यावेळीएका संशयित व्यक्तीकडून पेस्ट स्‍वरुपातील ५५९ ग्रॅम सोने आढळून आले होते. त्यामुळे सीमा शुल्क विभागाने संबंधित व्यक्तीकडून हे सोने जप्त केले आहे.

दरम्यान, सोन्याच्या तस्करीच्या संशयावरून संबंधित व्यक्तीकडे चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी सीमाशुल्क विभागाच्या पुणे विभागाकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details