पुणे - शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुणे शहराची राज्यात ओळखले जाते. शहर आणि जिल्ह्यात नामांकित महाविद्यालय आहेत. याच महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी शहरात देश-विदेशातून विद्यार्थी येत असतात. शिवाय ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले आहे. चाकण, मावळ, पिरंगुट, सणसवाडी, शिक्रापूर, रांजणगाव या परिसरात अनेक नामांकित कंपन्या आहेत. या कंपन्यात मोठ्या संख्येने कामगार वर्ग आहे. परंतु सांस्कृतिक, शैक्षणिक आणि औद्योगिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या या जिल्ह्याला अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांनी विळखा घातला की काय असा प्रश्न निर्माण झालाय. कारण मागील आठ महिन्यात पुणे शहरातून आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून तब्बल चार कोटी रुपये किमतीचा तेराशे किलो गांजा जप्त करण्यात आलाय.
पुणे जिल्ह्याला अंमली पदार्थाचा विळखा, आठ महिन्यात तब्बल 1300 किलो गांजा जप्त - पुणे ग्रामिण पोलीस बातमी
पुणे शहर पोलिसांनीही मागील आठ महिन्यात अंमली पदार्थाविरोधात धडक कारवाई करत तब्बल 1 कोटी 19 लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय. यामध्ये 222 किलो गांजा, ब्राऊन शुगर, चरस, अफू, कोकेन यांचा समावेश आहे. याप्रकरणी 102 आरोपींना अटक करण्यात आलीय. पुणे शहरात अमली पदार्थ विक्रीमध्ये परदेशी आरोपींचा भरणा असल्याचे चित्र समोर आले आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी मागील आठ महिन्यात विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 17 गुन्ह्यातील तब्बल 1162 किलो गांजा जप्त केलाय. याची किंमत 3 कोटी 63 लाख 69166 इतकी आहे. गांजा बाळगणाऱ्या एकूण 35 आरोपींना अटक करण्यात आलीय. पुणे शहर पोलिसांनीही मागील आठ महिन्यात अंमली पदार्थाविरोधात धडक कारवाई करत तब्बल 1 कोटी 19 लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय. यामध्ये 222 किलो गांजा, ब्राऊन शुगर, चरस, अफू, कोकेन यांचा समावेश आहे. याप्रकरणी 102 आरोपींना अटक करण्यात आलीय.
अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांकडून पुणे जिल्हा टार्गेट का?
मागील काही वर्षांपासून पुणे शहराने आयटी हब, अशी ओळख मिळवली आहे. त्यामुळे देशाच्या विविध राज्यातून मोठ्या संख्येने तरुण वर्ग नोकरीसाठी पुणे शहरात येतायत. ग्रामीण भागातही झपाट्याने औद्योगिकीकरण होत असल्यामूळे कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण वर्ग येत असतो. याच तरुणांना अंमली पदार्थाच्या जाळ्यात ओढून त्यांना व्यसन लावण्याचे काम तस्कराद्वारे केले जाते.
अंमली पदार्थ विक्रीत विदेशी तरुण
पुणे शहरात अमली पदार्थ विक्रीमध्ये परदेशी आरोपींचा भरणा आहे. नायजेरियामधून मेडिकल व्हिसा आणि बिझनेस व्हिसावर आलेल्या तरुणांचा मोठा सहभाग असल्याचे आतापर्यंतच्या कारवायामधून निष्पन्न झाले आहे.