महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 25, 2019, 9:03 AM IST

Updated : Dec 25, 2019, 9:15 AM IST

ETV Bharat / state

सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला पुण्याजवळ अपघात; 16 जखमी

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शालेय सहल घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १३ विद्यार्थी आणि ३ शिक्षक जखमी झाले आहेत. ही घटना आज(बुधवार) पहाटे चारच्या सुमारास घडली आहे. रस्त्यात बंद पडलेल्या ऊसाच्या ट्रॉलीला बसने पाठीमागून जोरदार धडक दिली.

st accident
अपघात

पुणे- जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शालेय सहल घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १३ विद्यार्थी आणि ३ शिक्षक जखमी झाले आहेत. ही घटना आज(बुधवार) पहाटे चारच्या सुमारास घडली आहे. रस्त्यात बंद पडलेल्या ऊसाच्या ट्रॉलीला बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एसटी बसचालक आणि 5 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर जखमी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसला पुण्याजवळ अपघात

हेही वाचा -पिंपरी-चिंचवडमध्ये एक लाख भीम अनुयायी म्हणणार महाबुद्ध वंदना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलिबाग येथून शालेय सहल परतत असताना तळेगाव दाभाडेजवळ रस्त्यात बंद पडलेल्या ऊसाने भरलेल्या ट्रॉलीला भरधाव बसने पाठीमागून जोरात धडक दिली. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली असून या अपघात १३ विद्यार्थी आणि ३ शिक्षक जखमी झाले आहेत. यातील पाच विद्यार्थी आणि बसचे चालक हे गंभीर जखमी आहेत.

हेही वाचा -कोरेगाव भीमा : शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे 'मॉक ड्रिल'

हे सर्व विद्यार्थी अलिबाग, महाबळेश्वर अशी पर्यटनस्थळे करून पुण्याच्या दिशेने जात होती. बसमध्ये एकूण ४४ विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. साखर झोपेत असताना अचानक अपघात झाल्याने सर्व विद्यार्थी भीतीच्या सावटाखाली आहेत. घटनेचा अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.

Last Updated : Dec 25, 2019, 9:15 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details