पुणे- जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढीचा वेग कमी होण्याची चिन्हे नाहीत. त्यातच आज सकाळी ९ वाजता आलेल्या नव्या अहवालानुसार काल रात्री ९ ते आज सकाळी ९, या १२ तासात जिल्ह्यात तब्बल १२७ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.
पुण्याला दिलासा नाही, १२ तासात १२७ कोरोनाबाधितांची नोंद - 127 patient in 12 hours pune
शहरात काल दिवसभरात रेकॉर्डब्रेक रुग्णांची नोंद झाली, तर जिल्ह्यात गेल्या १२ तासात तब्बल १२७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून जिल्ह्याचा आकडा १७२२ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण ८६ जणांचा मृत्यू झाला आहे.
डॉ. नायडू रुग्णालय
शहरात काल दिवसभरात रेकॉर्डब्रेक रुग्णांची नोंद झाली, तर जिल्ह्यात गेल्या १२ तासात तब्बल १२७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून जिल्ह्याचा आकडा १७२२ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण ८६ जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे २३० जणांनी आत्तापर्यंत कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात कोरोना वाढीचा वेग झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनासमोरील आव्हान वाढले आहे.
हेही वाचा-लॉकडाऊनच्या काळात लग्न.. पोलिसांनी वधुवरांचे केलेले स्वागत पाहुन तुम्हीही व्हाल चकीत