महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Disabled Couples Marriage : पुण्यात 12 दिव्यांग जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी ; थाटामाटात झाले कन्यादान - पुण्यात 12 दिव्यांग जोडप्यांचे लग्न

सक्षम पुणे महानगर व दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था आणि वैद्यकीय संशोधन केंद्र, वानवडी यांच्या पुढाकारातून पुण्यात 12 दिव्यांग जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. यावेळी नवरदेवांची वाजतगाजत वरात काढण्यात आली तर जोडप्यांना भेटवस्तू म्हणून संसारोपयोगी साहित्य दिले गेले.

Disabled Couples Marriage
दिव्यांग जोडप्यांचे लग्न

By

Published : May 14, 2023, 6:06 PM IST

पहा दिव्यांग जोडप्यांचे लग्न

पुणे : माणसाला आयुष्यात सगळ्यात जास्त आनंद त्याच्या लग्नाच्या वेळेस होतो. असाच काहीसा आनंदाचा क्षण पुण्यातील 12 दिव्यांग जोडप्यांनी अनुभवला. या जोडप्यांनी लग्न करत आपल्या नव्या आयुष्याला सुरवात केली आहे. यावेळी सनई चौघड्याचा नाद तसेच बँडच्या तालावर वाजत - गाजत निघालेली वरात, वरातीत बँडच्या तालावर नाचणारे लोक तसेच रथामध्ये दिमाखात बसलेले नवरदेव, अश्या थाटामाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला.

संसारोपयोगी साहित्य भेटवस्तू म्हणून दिले :सक्षम पुणे महानगर व दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व वैद्यकीय संशोधन केंद्र, वानवडी यांच्या पुढाकारातून या 12 दिव्यांग जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा वानवडी येथील संस्थेच्या आवारात मोठ्या दिमाखात पार पडला. विशेष बाब म्हणजे या वेळी या 12 जोडप्यांना स्वयंपाक घरातील भांडी, देवघरातील साहित्य, सोफा, बेड तसेच बाथरूममधील साहित्य व घरातील विविध वस्तू अश्या अनेक भेटवस्तू देण्यात आल्या.

कन्यादानासह विवाह सोहळा संपन्न : गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम घेण्यात येत असून याद्वारे दिव्यांगांच्या चेहेऱ्यावर आनंद आणण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. यंदा 12 जोडपी विवाहबंधनात अडकली आहेत. हा या दिव्यांगांच्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण आहे, असे ॲड. मुरलीधर कचरे यावेळी म्हणाले. काही दिवसांपूर्वी परिचय मेळावा घेत दिव्यांगांचे समुपदेशन करण्यात आले. उपवरांच्या घरी भेटी देऊन विवाह निश्चित केले गेले. आज आपण पाहिलं तर सामान्य जोडप्याप्रमाणेच या 12 दिव्यांगांचा विवाह थाटात कन्यादानासह संपन्न झाला आहे. भेटवस्तू म्हणून सर्व संसारोपयोगी साहित्य दिले आहे. यासाठी विविध लोकांचं मोलाचे सहकार्य लाभले, असे यावेळी समन्वयक दत्तात्रय लखे म्हणाले.

हे ही वाचा :

  1. Amol Kolhe News : फ्री पासकरिता पोलिसांची आयोजकांना धमकी, अमोल कोल्हेंनी भर कार्यक्रमात प्रेक्षकांना सांगितली माहिती
  2. Indian Baseball Team Captain: मेंढपाळाची पोरगी झाली भारतीय बेसबॉल संघाची कर्णधार; जाणून घेवू तिचा संघर्षमय प्रवास
  3. Mauli Palkhi : यंदाही आळंदी माउलींच्या रथाची धुरा 'सर्जा-राजा'कडे; भोसले कुटुंबाला मिळाला मान

ABOUT THE AUTHOR

...view details