पुणे- शुक्रवारी दिवसभरात नव्याने कोरोनाबाधित तब्बल 99 रुग्ण आढळले असून पुण्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2245 इतका झाला आहे. तर, दिवसभरात सर्वाधिक 12 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
पुण्यात शुक्रवारी दिवसभरात 12 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू, 99 नवे रुग्ण - 12 death in pune due to corona
कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेल्या 61 रुग्णांना घरी सोडण्यात आले. पुण्यात आजवर 2245 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून त्यातील 137 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर, उपचारानंतर बऱ्या झालेल्या 732 रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. अजूनही 1377 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुण्यातील एकूण मृतांचा आकडा 137 वर जाऊन पोहोचला आहे. कोरोनाची ही वाढती आकडेवारी पुणेकरांच्या दृष्टीने चिंता वाढवणारी आहे. मृतांमध्ये ससून रुग्णालयातील तिघांचा समावेश, केईम रुग्णालयातील तिघांचा समावेश आहे.
शुक्रवारी मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आठ महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. तर, अजूनही 76 रुग्ण क्रिटिकल अवस्थेत आहेत. याशिवाय कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेल्या 61 रुग्णांना घरी सोडण्यात आले. पुण्यात आजवर 2245 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून त्यातील 137 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर, उपचारानंतर बऱ्या झालेल्या 732 रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. अजूनही 1377 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.