पुणे : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. शहरातील चिंचवड येथे एकाच सोसायटीमध्ये 11 बाधित रुग्ण आढळले. यावरून संसर्ग वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी तातडीच्या उपाययोजना म्हणून संबंधित सोसायटी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली आहे. शहरातील 19 भागही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच सोसायटीत आढळले 11 जण कोरोनाबाधित
पिंपरी-चिंचवड शहरात सध्या बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. गुरुवारी शहरातील विविध भागात तब्बल 453 जण कोरोनाबाधित आढळले असून तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सध्या बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. गुरुवारी शहरातील विविध भागात तब्बल 453 जण कोरोनाबाधित आढळले असून तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकीकडे महानगर पालिका प्रशासन नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात वारंवार आवाहन करत आहे. परंतु, शहरातील लोक विनामास्क फिरत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सोसायटीत आढळले 11 कोरोनाबाधित रुग्ण
त्यामुळे पोलीस आणि महानगर पालिकेकडून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शहरातील 19 ठिकाणी दोनपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने ते भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून एकाच सोसायटीमध्ये 11 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे ती इमारत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. गर्दीमध्ये जाणे टाळणे, सॅनिटायझर वापरणे, सुरक्षित अंतर राखणे, असे नियम नागरिकांनी पाळल्यास शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास नक्की हातभार लागेल यात शंका नाही.