पुणे - मोबाईलच्या अतिवापरामुळे दहावीच्या विद्यार्थ्याकडे पाहिल्यावर तो पाचवीला असल्यासारखा वाटतो, असा अजब दावा भाजपचे राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी केला आहे. ते तळेगाव दाभाडे येथे खासगी शाळेत पालकांना संबोधित करत असताना बोलत होते.
मोबाईलच्या अतिवापरामुळे 10 वी'तील विद्यार्थी पाचवीचा वाटतो; भाजप मंत्र्याचा अजब दावा - पुणे
विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही व्यायाम केला पाहिजे. मात्र, लोक गप्पा मारण्यात जास्त वेळ घालवतात. त्यामुळे पालकांनीही व्यायाम करावा, असे आवाहन भेगडे यांनी केले आहे.
पुढे बोलताना भेगडे म्हणाले की, आजच्या जीवनात मुले हातात मोबाईल असल्यामुळे मैदानावरचे खेळ खेळत नाहीत. त्यामुळे पालकांनी मुले मोबाईल हातात घेणार नाहीत, याकडे पाहणे गरजेचे आहे. त्याबरोबरच विद्यार्थांना चांगल्या पद्धतीचा आहार, मैदानावरचे खेळ गरजेचे आहेत. लहान वयात मुलांच्या शरीराची योग्य वाढ आणि त्यांची इच्छाशक्ती प्रतिसाद देणारी निर्माण झाली पाहिजे. असे विद्यार्थी भविष्यातील आव्हाने स्वीकारू शकतो, असेही भेगडे यावेळी म्हणाले.
विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही व्यायाम केला पाहिजे. मात्र, लोक गप्पा मारण्यात जास्त वेळ घालवतात. त्यामुळे पालकांनीही व्यायाम करावा, असे आवाहन भेगडे यांनी केले आहे.