महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 28, 2021, 2:20 PM IST

Updated : Mar 28, 2021, 4:59 PM IST

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज निघतो 1 हजार टन घनकचरा; मात्र, कचऱ्याचे विलगीकरण नाही

कचऱ्याचे विलगीकरण होत नाही. एकत्रित रित्या हा कचरा मोशी डेपोत एकत्र केला जातो. कचऱ्याचे मोठं मोठे डोंगर तयार होत आहेत. त्यांची दुर्गंधी सुटते. त्यावर औषध फवारायला हवे. परंतु तसे होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो. यावर प्रशासनाने पर्याय काढला पाहिजे.

घनकचरा
घनकचरा

पुणे-पिंपरी-चिंचवड शहरात दररोज एक हजार टन कचरा निघतो. त्यावर मोशी येथील कचरा डेपोमध्ये नेऊन प्रक्रिया केली जाते. मात्र, पावसाळा आला की कचरा डेपो शेजारी राहत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. महानगर पालिकेकडून कोट्यवधींची टेंडर काढले जातात. मात्र, त्यातून केवळ मलिदा लाटण्याचे काम महानगर पालिकेकडून होते असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज निघतो 1 हजार टन घनकचरा
पिंपरी-चिंचवडची 25 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्यापिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीत 25 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असून दररोज 1 हजार टन ओला, सुका, वैद्यकीय, औद्योगिक क्षेत्रातून कचरा गोळा केला जातो. तो पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या मोशी कचरा डेपो येथे आणून त्यावर प्रक्रिया केली जात असल्याची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली आहे. प्रत्यक्षात मात्र, वेगवेगळा कचरा एकत्रित गोळा करून थेट आहे तसाच मोशी कचरा डेपोमध्ये टाकला जातो असे सामाजिक कार्यकर्ते भापकर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ असे देखील त्यांनी म्हटले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज निघतो 1 हजार टन घनकचरा

हेही वाचा-होळीच रंगीत चित्र, जाणून घ्या देशभरात कुठे, कशी साजरी केली जाते

कोट्यवधींचे टेंडर निघतात
पिंपरी-चिंचवड शहरातील लोकसंख्या 25 लाखांपेक्षा अधिक आहे. शहरात ओला आणि सुखा कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. महानगर पालिकेच्या वतीने कचरा जमा करून तो मोशी येथील कचरा डेपोत घेऊ जातात. तिथे त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. यादरम्यान महानगर पालिकेकडून कोट्यवधींचे टेंडर निघतात, यातून गैरव्यवहार होतात, यापलीकडे दुसरे काम होत नाही. असा आरोप भापकर यांनी केला आहे.

कचऱ्याचे विलगीकरण होत नाही
तसेच कचऱ्याचे विलगीकरण होत नाही. एकत्रित रित्या हा कचरा मोशी डेपोत एकत्र केला जातो. कचऱ्याचे मोठं मोठे डोंगर तयार होत आहेत. त्यांची दुर्गंधी सुटते. त्यावर औषध फवारायला हवे. परंतु तसे होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो. यावर प्रशासनाने पर्याय काढला पाहिजे. असे मारुती भापकर म्हणाले. दरम्यान, इतर ठिकाणी कचरा डेपो सुरू करण्याच्या हालचाली सुरू असून लवकरच ती प्रक्रिया पूर्ण होईल, असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले . सध्या तरी योग्य पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-नागपुरात कोरोनाचा धुमाकूळ; एका दिवसात 54 मृत्यू

Last Updated : Mar 28, 2021, 4:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details