पुणे - कोरेगाव पार्क परिसरातील प्रसिद्ध रुग्णालयातील मेडिकलमधून 100 मास्क आणि औषधी चोरल्याचा प्रकार घडला आहे. हा संपूर्ण प्रकार शनिवारी उघडकीस आला. फार्मासिस्टला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली. सुयश हिराचंद पांढरे (वय - 28) असे या आरोपीचे नाव आहे.
पुण्याच्या प्रसिद्ध रुग्णालयाच्या मेडिकलमधून 100 मास्क चोरीला; एकाला अटक - 100 mask theft pune
सुयश हा प्रसिद्ध रुग्णालयातील मेडिकलमध्ये कामाला होता. या रुग्णालयातील मेडिकलमध्ये काम करीत असताना त्याने 100 मास्क, इंजेक्शन, औषधी असे 36 हजार रुपये किमतीचे मेडिकलमधील साहित्य चोरून नेले. दरम्यान, मेडिकल प्रशासनाच्या वतीने औषधांची तपासणी करत असताना हा प्रकार उघडकीस आला.
आरोपी सुयश हा प्रसिद्ध रुग्णालयातील मेडिकलमध्ये कामाला होता. या रुग्णालयातील मेडिकलमध्ये काम करीत असताना त्याने 100 मास्क, इंजेक्शन, औषधी असे 36 हजार रुपये किमतीचे मेडिकलमधील साहित्य चोरून नेले. दरम्यान, मेडिकल प्रशासनाच्या वतीने औषधांची तपासणी करत असताना हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर अॅलन थॉमस यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गुरव करीत आहेत.
हेही वाचा -'कोरोना' प्रतिबंधासाठी विदेशात वापरलेल्या ‘त्या’ मास्क विक्रीच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश