पुणे- एका प्राणीमित्र महिलेने रस्त्यावरून आणलेली भटके श्वान चावल्याच्या रागातून दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने महिलेवर तुफान दगडफेक केली. तसेच या महिलेच्या घरात असणाऱ्या कुत्र्यांनाही या टोळक्याने दगडाने मारहाण केली. पुण्याच्या कोंढवा परिसरात ही घटना घडली. एका 64 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर कोंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी दहा ते पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान फिर्यादी महिलेचा श्वान चावल्यामुळे एका ज्येष्ठ महिलेला दुखापत झाली आहे.
पुणे : श्वान चावल्यामुळे प्राणीमित्र महिलेच्या घरावर दगडफेक, कुत्र्यांनाही दगडाने मारहाण - Pune Animal friends news
प्राणीमित्र महिलेने रस्त्यावरून आणलेली भटके श्वान चावल्याच्या रागातून दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने महिलेवर तुफान दगडफेक केली.
दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने प्राणीमित्र महिलेच्या घरावर हल्ला केला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कोंढव्यातील शिवनेर नगर परिसरात राहण्यास असून त्या प्राणी प्रेमी आहेत. त्यांनी रस्त्यावरील दहा ते बारा भटकी कुत्री स्वतःच्या घरात आणून ठेवली आहेत. काही दिवसांपूर्वी या महिलेच्या घरासमोरून जाणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेला यातील एक कुत्रा चावला होता. याच रागातून दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने प्राणीमित्र महिलेच्या घरावर हल्ला केला. त्यांच्या घराचे पत्र्याचे कंपाऊंड दगड मारून पाडले आणि त्यांच्या घरावर दगडफेक केली. शिवाय घरात असणाऱ्या कुत्र्यांवर देखील दगडाने हल्ला केला. संबंधित प्राणीमित्र महिलेने तक्रार दिल्यानंतर कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
वाद-विवाद होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत
दरम्यान श्वान पाळणारे प्राणीमित्र आणि स्थानिक नागरिकांमध्ये वाद-विवाद होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. प्राणीमित्र त्या त्या भागात जाऊन भटक्या भटक्या श्वानांना खायला देतात आणि त्रास मात्र आम्हाला भोगावा लागतो अशी भावना स्थानिक नागरिकांमध्ये आहे.