महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्रसह कर्नाटकात महापूर, बचावकार्यासाठी लष्कराच्या 1 हजार जवानांची तुकडी तैनात - एनडीआरएफ

पाऊस सुरू असल्यामुळे भारतीय लष्कर आणि एनडीआरएफला पूरग्रस्त परिसरांमध्ये पोहोचण्यासाठी विलंब होत आहे.

महाराष्ट्रसह कर्नाटकात महापूर

By

Published : Aug 7, 2019, 7:46 PM IST

Updated : Aug 7, 2019, 8:12 PM IST

पुणे- महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील 6 जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामध्ये अनेक नागरिक अडकले आहेत. या नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय लष्कराचे 1 हजार जवान रवाना झाले आहेत, अशी माहिती भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

महाराष्ट्र, कर्नाटकात महापूर

लष्कराच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, बेळगाव, बागलकोट रायचूर, कोल्हापूर, सांगली आणि रायगड जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या 500 नागरिकांना भारतीय सैन्याच्या जवानांनी बाहेर काढले आहे. त्याप्रमाणेच या जिल्ह्यांमध्ये 1300 नागरिक पुराच्या पाण्यामाध्ये अडकल्याची शक्यता ही लष्कराने वर्तवली आहे.

बचावकार्यासाठी लष्कराच्या 1 हजार जवानांची तुकडी तैनात

पुण्यातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) तुकडी देखील कोल्हापूरमध्ये दाखल झाली आहे. दरम्यान, पाऊस सुरू असल्यामुळे भारतीय लष्कर आणि एनडीआरएफला पूरग्रस्त परिसरांमध्ये पोहोचण्यासाठी विलंब होत आहे. मात्र, तरी देखील मदत आणि बचाव कार्य सुरू ठेवण्यात येणार असल्याचे भारतीय लष्कराच्या वतीने सांगण्यात आले आहे.

500 नागरिकांना भारतीय सैन्याच्या जवानांनी बाहेर काढले
Last Updated : Aug 7, 2019, 8:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details