पुणे - विभागातील 230 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे पुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 457 झाली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्ण 1 हजार 139 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 48 रुग्ण गंभीर आहेत. उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्ह्यात 1 हजार 319 बाधित रुग्ण आहेत तर 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात 33 बाधित आहेत आणि 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 65 बाधित रुग्ण आहेत तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 29 बाधित रुग्ण आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 11 बाधित आहेत.