चोरुन मद्यविक्री, पुण्याच्या प्रतिष्ठित कोरेगाव पार्क परिसरातून ९ लाखांचा मद्यसाठा जप्त - pune liquor news
मद्यविक्री करणाऱ्या कलीमुद्दीन रियाजुद्दीन शेख याला मद्यविक्री करताना रंगेहाथ पकडले. या बारमधील ८ लाख ८४ हजार रुपये किमतीचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरून मद्यविक्री, पुण्याच्या प्रतिष्ठित कोरेगाव पार्क परिसरातुन ९ लाखाचा मद्यसाठा जप्त
पुणे - लॉकडाऊनच्या काळात बंदी असतानाही चोरुन मद्यविक्री करणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरातील एका रेस्टो बारमधून पोलिसांनी तब्बल ९ लाख रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. कलीमुद्दीन रियजुद्दीन शेख असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क परिसरातील सतरंज रेस्टो अँड बारमध्ये चोरून मद्यविक्री होत असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त अपर अशोक मोराळे यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवले आणि खात्री होताच उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यासह छापा टाकला. यावेळी मद्यविक्री करणाऱ्या कलीमुद्दीन रियाजुद्दीन शेख याला मद्यविक्री करताना रंगेहाथ पकडले. या बारमधील ८ लाख ८४ हजार रुपये किमतीचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.Last Updated : Apr 17, 2020, 2:28 PM IST