पुणे -पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या भोसरी एमआयडीसी, वाकड आणि हिंजवडी परिसरातून एक लाख ५० हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस तपास करत आहेत.
हेही वाचा -सत्ता स्थापनेचा घोळ घालून अप्रत्यक्ष सरकार हाकणे घटनाविरोधी, सामनातून मुख्यमंत्र्यावर टीका
गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात दुचाकी चोरीच्या घटना घडत असून पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. विजय यांची रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास १५ हजार रूपये किमतीची दुचाकी सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी दुचाकी चोरून नेली आहे. तर सुमीत ईश्वर मोहरकर (रा.थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमीत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुमीत यांनी रविवारी पहाटे ८० हजार रूपये किमतीची दुचाकी विशालनगर येथील शिवसृष्टी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केली.
अज्ञात चोरट्यांनी या दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. त्याचबरोबर गणेश नबु श्रीवार यांनी त्यांची १५ हजार रूपये किमतीची दुचाकी शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास हिंजवडी मधील बिग बाजार येथे पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची देखील दुचाकी चोरून नेली आहे. याबाबत त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिवानंद सिद्धराम साखरे (रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली. शनिवारी रात्री आठच्या सुमारास हिंजवडी मधील शेल पेट्रोल पंपाजवळ असलेल्या मैदानात त्यांची ४० हजार रूपये किमतीची दुचाकी पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी लंपास केली आहे. वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.