पुणे- ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन दिवसरात्र मेहनत घेत असताना, आता राजगुरुनगर परिसरात कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे. हा व्यक्ती पुण्यातील जहांगीर रुग्णालयात शिपाई म्हणून काम करत होता. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्याचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
राजगुरुनगर परिसरात आढळला कोरोना रुग्ण - कोरोना इन राजगुरुनगर
राजगुरुनगर परिसरात आढळलेला रुग्ण हा पुण्यातील जहांगीर रुग्णालयात शिपाई म्हणून काम करत होता. हा रुग्ण दिवसाआड राजगुरुनगर येथून पुण्यात प्रवास करत असल्याने त्याच्या संपर्कात येणारे प्रवासी, कुटुंब, गावातील नागरिक यांची आरोग्य तपासणी करून सर्वांना तातडीने क्वारंटाईन करण्याचे आदेश दिल्याचे आयुष प्रसाद यांनी सांगितले.
राजगुरुनगर परिसरात आढळलेला रुग्ण हा पुण्यातील जहांगीर रुग्नालयात शिपाई म्हणून काम करत होता. हा रुग्ण दिवसाआड राजगुरुनगर येथून पुण्यात प्रवास करत असल्याने त्याच्या संपर्कात येणारे प्रवासी, कुटुंब, गावातील नागरिक यांची आरोग्य तपासणी करून सर्वांना तातडीने क्वारंटाईन करण्याचे आदेश दिल्याचे आयुष प्रसाद यांनी सांगितले. चाकण राजगुरुनगर परिसरात कोरोनाचा आजपर्यत एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र, आता कोरोनाने राजगुरुनगर परिसरात शिरकाव केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीणमध्ये 85 रुग्ण असून त्यापैकी 60 रुग्न हे अत्यावश्यक सेवेतील आहेत. यामध्ये पोलीस, डॉक्टर, भाजीविक्री करणारे लोक, नर्स यांचा यात समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी आधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.