महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कंटेनरमधील इलेक्ट्रॉनिक सामानात लपवून जाणारा 6 लाखांचा तंबाखू जप्त; परभणी 'एलसीबी'ची कारवाई - परभणीत तंबाखूचा साठा जप्त

दिल्ली येथून परळीकडे जाणाऱ्या भल्यामोठ्या कंटेनरमध्ये तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यांनी पथक तयार करुन कारवाई केली असता या कंटेनरमधून नाव नसलेल्या तंबाखूची 160 पाकिटे सोबत, रत्ना तंबाखूचे 800 बॉक्स तसेच रत्ना तंबाखूचे 400 टिन पॅक देखील सापडले. हा सर्व साठा पोलिसांनी जप्त केला असून या तंबाखूची किंमत 5 लाख 72 हजार 400 रुपये एवढी आहे. या शिवाय ताब्यात घेण्यात आलेल्या कंटेनरसह एकूण मुद्देमालाची किंमत 30 लाख 72 हजार 400 रुपये असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.

परभणी 'एलसीबी'ची कारवाई
परभणी 'एलसीबी'ची कारवाई

By

Published : Jun 5, 2020, 10:25 PM IST

परभणी - येथे एका भल्यामोठ्या कंटेनरमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू, भांडे, स्टेशनरी आणि ताडपत्री आदी साहित्यामध्ये दडवून ठेवलेला सुगंधित तंबाखूचा मोठा साठा परभणीच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे. या तंबाखूची किंमत 5 लाख 72 हजार 400 रुपये असून, यासह कंटेनरमधील साहित्य नानलपेठ पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीप्रमाणे परभणी शहरातील आपना कॉर्नर येथून एका कंटेनरमधून तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक केली जात असल्याचे समजले. त्यानुसार पथक तयार करण्यात येऊन दिल्ली येथून परळीकडे जाणाऱ्या या भल्यामोठ्या कंटेनरला अडवण्यात आले. त्यानंतर हे कंटेनर नानलपेठ पोलिस ठाण्यात आणून जमा करण्यात आले. या कंटेनरमधील साहित्याची तपासणी केली असता, यातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, भांडे, स्टेशनरी, ताडपत्री आदी मालाच्या आत दडवून ठेवलेला सुगंधित तंबाखूचा साठा मिळून आला. यामध्ये कुठलेही नाव नसलेल्या तंबाखूची 160 पाकिटे सोबत, रत्ना तंबाखूचे 800 बॉक्स आढळून आले. त्याचे वजन 182 किलो एवढे आहे. तसेच रत्ना तंबाखूचे 400 टिन पॅक देखील सापडले असून हा सर्व साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या तंबाखूची किंमत 5 लाख 72 हजार 400 रुपये एवढी आहे. या शिवाय ताब्यात घेण्यात आलेल्या कंटेनरसह एकूण मुद्देमालाची किंमत 30 लाख 72 हजार 400 रुपये असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.

दरम्यान हा साठा परळीकडे जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तरी देखील नानलपेठ पोलिसांकडून हा कंटेनर कोठून आला, कोणासाठी जात होता, याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक राग सुधा, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे, सुग्रीव केंद्रे, मधुकर चट्टे, हनुमंत जक्केवाड, शंकर गायकवाड आणि अरुण पांचाळ यांच्या पथकाने केली.

ABOUT THE AUTHOR

...view details