परभणी- शहरातील एकता नगरमध्ये असलेल्या गांधी विद्यालयामध्ये सखी मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. या ठिकाणी सर्व महिलांनी मतदान केंद्राची जबाबदारी सांभाळली. या मतदान केंद्रावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. तसेच येथे येणाऱ्या मतदारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
परभणीतील सखी मतदान केंद्रावर पुष्पगुच्छ देऊन मतदारांचे स्वागत - Sakhi voting Center
शहरातील एकता नगरमध्ये असलेल्या गांधी विद्यालयामध्ये सखी मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. या ठिकाणी सर्व महिलांनी मतदान केंद्राची जबाबदारी सांभाळली.
परभणीतील सखी मतदान केंद्रावर पुष्पगुच्छ देऊन मतदारांचे स्वागत
निवडणुक विभागाने यावेळी पहिल्यादांच सखी मतदान केंद्राचा उपक्रम राबविला आहे. या मतदान केंद्रावर सर्व महिला कर्मचारी होत्या. यावेळी महिलांकडून मिळणाऱ्या चांगल्या वागणुकीमुळे मतदारांमध्येही समाधान पहायला मिळाले.